STATE NEWS १३ वर्षांची मुलगी १९ आठवड्यांची गर्भवती! म्हणाली कसे झाले मला माहीत नाहीत..! पोलीस तपासात "सत्य" समोर आल्यावर सारेच हादरले!

 
अमरावती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी १९ आठवड्यांची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक अन् तितकाच खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा मला यातले काहीच माहीत नाही..मी कशी   गर्भवती राहिले मला माहीतच नाही असे पीडित मुलगी पोलिसांना सांगत होती. मात्र पोलिसांनी दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर या पापामागे एका १७ वर्षीय मुलाचा हात असल्याचे समोर आल्याने मुलीच्या नातेवाईकांना धक्काच बसला आहे.

पीडित १३ वर्षांची मुलगी अमरावती शहरातील राजापेठ भागात राहणारी आहे. तीन दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी झाल्यानंतर मुलगी १९ आठवडे  म्हणजेच साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. राजापेठ पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मुलीला विचारणा केली तेव्हा हे कशामुळे झाले मला माहीत नाही असे मुलीने सांगितले.

मात्र दोन दिवस "तांत्रिक" तपास केल्यानंतर या  कृत्यामागे राजापेठ भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगा असल्याचे समोर आले. प्रेमाच्या जाळ्यात फसवून १७ वर्षीय मुलाने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. अखेर मुलीने सुद्धा "त्या" मुलानेच अत्याचार केल्याचे सांगितल्यानंतर मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास अमरावतीचे राजापेठ पोलीस करीत आहेत.