अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य!; राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अडचणीत!!, गुन्हा दाखल
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात हे वसतिगृह चालविले जाते. श्यामकुंवर या वसतिगृहाचे संचालक आहेत. पीडित मुलगी मोहाडी तालुक्यातील असून, काही दिवसांपूर्वी ती मूळ गावी गेली होती. २५ फेब्रुवारीला श्यामकुवर यांनी तिच्या वडिलांना फोन केला व तिला घ्यायला आल्याचे सांगितले. खुद्द संचालकच घ्यायला आल्याने वडिलांनी विश्वास ठेवला व मुलीला त्यांच्या कारमध्ये बसवून दिले.
भंडाऱ्याकडे येताना डोंगरगाव ते विहिरगाव मार्गावरील निर्जन ठिकाणी कार थांबवून श्यामकुंवर यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर तिला वसतिगृहात आणून सोडले. हा प्रकार मुलीने मैत्रिणीला सांगितला. तिने विद्यार्थिनीच्या वडिलांना ही माहिती दिली. तिच्या वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. शामकुंवर यांनी राष्ट्रवादीकडून सावरी ठाणा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.