'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप नशीबवान; शुक्राच्या प्रभावामुळे जीवनात कमावतात खूप पैसा आणि मोठे नाव!

 
काही संख्या आपल्यासाठी शुभ असतात तर काही अशुभ. आजकाल माणूस आपला मोबाइल नंबर आणि गाडीचा क्रमांकसुद्धा काळजीपूर्वक निवडतो. जन्मतारखेनुसार वेगवेगळ्या भाग्यवान संख्या तयार केल्या जातात. त्याचे चांगले परिणामही समोर येतात...

१ ते ९ या प्रत्येक संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य आहे. महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक ६ असतो. ६ चा स्वामी शुक्र देव आहे. या तारखेला जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. हे लोक अतिशय रोमँटिक असतात. त्यांच्या वागण्या- बोलण्याने ते कुणाचेही लक्ष वेधून घेतात. शुक्राच्या प्रभावाखाली असलेली ही माणसे आयुष्यात खूप नाव आणि संपत्ती कमावतात.

शुक्र हे प्रेम आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शुक्राच्या प्रभावाखाली असलेल्या या लोकांना त्यांच्या प्रेमात कधीही अडचणी येत नाहीत. या लोकांना वृद्धत्व लवकर येत नाही. हे लोक कला आणि मनोरंजनप्रेमी असतात. सौंदर्याकडे ते लवकर आकर्षित होतात. ते पहिल्याच भेटीत कुणालाही त्यांचे वेड लावू शकतात. मैत्री जपण्यात ही माणसे आघाडीवर असतात. इतरांच्या दुःखात ही माणसे नेहमी सोबत असतात. या लोकांना चित्रपट आणि वस्त्र, दागिने याच्या व्यवसायात यश मिळण्याची जास्त शक्यता असते. हलका निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग मूल्यांक ६ असणाऱ्यांना शुभ मानला जातो.