दिशा सालियन प्रकरणामुळे नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या!
Feb 22, 2022, 10:47 IST
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. राज्य महिला आयोग सक्रिय झाला असून, मालवणी पोलिसांना या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
दिशावर लैंगिक अत्याचार झालाच नव्हता, तरीही राणे वक्तव्ये करून मृत्यूनंतरही तिची बदनामी करत असल्याने महिला आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. दिशावर बलात्का र होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मं त्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल नारायण राणे यांनी चार दिवसांपूर्वी करून प्रकरणाला नव्याने वाचा फोडली होती. तिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते.
त महिन्यांनंतरही दिशाचा शवविच्छेदन अ
हवाल आलेला नाही. तिच्या इमारतीच्या वॉचमनकडील रजिस्ट्ररमधील पाने कोणी फाडली, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यात इतका रस होता, असे सवाल राणेंनी करून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या आरोपांवर गांभीर्याने तपासाचे आदेश देण्या ऐवजी राज्य महिला आयोगाने त्यांनाच अडचणीत आणण्याची पावले उचलल्याचे दिसत आहे. मालवणीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना राणेंच्या वक्तव्याबद्दल ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.