जितेंद्र आव्हाड म्‍हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळेच मी आज जीवंत!

 
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी आज जीवंत आहे. कोरोना काळात मी कोमात गेलो होतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळे आणि घेतलेल्या काळजीमुळेच मी वाचू शकलो, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

आव्हाड म्‍हणाले, की कोमात जाऊन मी घरातच कोसळलो होतो. तेव्हा ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले. ही बाब मुख्यमंत्र्यांना कळल्यानंतर त्यांनी मिलिंद नार्वेकरांमार्फत निरोप पाठवून फोर्टीस रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. पत्नी ऋता आव्हाड यांनी हा निरोप नाकारून तिथे हलविण्यास नकार दिला. त्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याशी बोलून ऋता आव्हाड यांची समजूत काढली. त्यानंतर फोर्टीस रुग्णालयात भरती करण्यात आले.

तिथे १२ दिवसांनी बरा झालो. या १२ दिवसांत व्हेंटिलेटरवर होतो. सर्वांना वाटलं की मी काही आता जगत नाही. विरोधकांना तर आनंदच झाला होता. मात्र केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि ऋता आव्हाड या तिघांनाच माझ्या प्रकृतीबद्दल माहिती होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबवत्सल असून, कुटुंबाला कसे जपायचे हे त्यांना माहिती आहे, असे आव्हाड म्‍हणाले. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची गरज असल्याचेही ते म्‍हणाले.