झारखंड हादरले... सालीच्या प्रेमप्रकरणामुळे इज्‍जत धोक्‍यात आल्याने प्रियकरासह तिची चाकू हत्‍या!; हत्‍येपूर्वी ५ जणांनी केला आळीपाळीने बलात्‍कार!!

 
रांची (झारखंड) ः सालीच्या प्रेम प्रकरणामुळे बदनामी होत असल्याने तिला प्रियकरासोबत लग्न लावून देतो असे सांगून निर्जनस्थळी बोलावले. प्रियकर- प्रेयसी तिथे येताच दोघांनी हत्‍या करण्यात आली. हत्‍येपूर्वी तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्‍कार केला. झारखंडला हादरवून टाकणारी ही घटना रांचीच्या सिल्ली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या तानाडी मोड भागात समोर आली आहे.

प्रियकर- प्रेयसीचे मृतदेह मुरी बरलांगा रेल्वे उड्डाणपुलाखाली आढळले. ही बाब नागरिकांनी पोलिसांना कळवताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. सुरुवातीला हा आत्‍महत्‍येचा प्रकार वाटला. मात्र उत्तरीय तपासणीत तरुणीवर हत्‍येपूर्वी सामूहिक बलात्‍कार झाल्याचे समोर आले.

त्‍यांनी पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि हत्‍येत तरुणीचा भाऊजी विष्णू मांझी याचा हात असल्याचे समोर आले. त्‍याला ताब्‍यात घेताच त्‍याने त्‍याच्या साथीदारांची नावे सांगितली. श्रीपद मांझी, भोलानाथ मांझी, सुशील मांझी आणि दिनेश मांझी यांनाही तातडीने अटक करण्यात आली. आरोपी विष्णू मांझीने पोलिसांना सांगितले, की मृतक तरुणी अल्पवयीन होती. तिचे राजेश मांझी नावाच्या तरुणावर प्रेम होते. दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे तिच्या घरचे नाराज होते.

तिला अनेकदा समजावूनही ती ऐकत नव्हती. इज्जत धोक्‍यात आल्याने विष्णूने दोघांनाही संपविण्याचा कट रचला. त्‍यासाठी मित्रांची मदत घेतली. तिला लग्न लावून देतो असे सांगून प्रियकरासह बोलावले होते. तिच्यावर आळीपाळीने बलात्‍कार करून नंतर चाकूने वार करत त्‍यांची हत्‍या करण्यात आली.