पती-पत्‍नीने घरातच सुरू केला कुंटनखाना!; उत्तरप्रदेशातून आणली होती तरुणी, एका ग्राहकाचे देत होते ५००, नागपूर LCB ने केला पर्दाफाश!!

 
नागपूर : घरातच कुंटनखाना सुरू करणाऱ्या पती-पत्‍नीचा पर्दाफाश नागपूरच्या स्‍थानिक गुन्हे शाखेने केला आहे. परराज्यातील मुलींना नोकरी, पैशाचे आमिष दाखवून हे दाम्‍पत्‍य त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी छापा मारून २० वर्षीय तरुणीची सुटका केली. नागपुरातील गिट्टीखदान भागातील कबीर बेला अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता.

नागपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला यासंदर्भात माहिती मिळाली होती. गिट्टीखदान भागातील कबीर बेला अपार्टमेंटमधील ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी एक बनावट ग्राहक खात्री करण्यासाठी पाठवला. देहव्यापार सुरू असल्याची माहिती बनावट ग्राहकाने बाहेर असलेल्या पोलिसांच्या पथकाला मिस कॉल करून दिली. त्यानंतर लगेच पोलिसांनी छापा मारला. फ्लॅटमालक अमित गौतमराव जोगी (४१) व त्याची पत्‍नी स्वाती अमित जोगी(३२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फ्लॅटमधील एका खोलीतून २२ वर्षीय तरुणीची पोलिसांनी सुटका केली. तिने ती उत्तरप्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने रेल्वेत एका सिमरन नावाच्या महिलेशी ओळख झाल्याचे सांगितले.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तरुणीने तिच्याकडे काम मागितले. सिमरनने तिला फिरायला जाण्याचे कारण सांगत जिल्ह्यातील वणी येथे आणले. तिथे मीनाक्षी नावाच्या एका महिलेसोबत तरुणीची ओळख करून दिली. मीनाक्षीने तू जर वेश्या व्यवसाय केला तर चांगले पैसे मिळतील. मी जागा उपलब्ध करून देते, असे तिला सांगितले. त्यामुळी तरुणी वेश्याव्यवसाय  करण्यासाठी तयार झाली.

मीनाक्षी तिला प्रत्येक ग्राहकामागे ५०० रुपये देत होती, असे तिने पोलिसांना सांगितले. १० दिवस वणी येथे व्यवसाय केल्यानंतर २० दिवसांपूर्वी मिनाक्षीने तिला नागपुरात स्वाती जोग हिच्या फ्लॅटवर आणले. इथे स्वाती माझ्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय करवून घेणाऱ्या पती- पत्नीला अटक केली.त्यांच्याकडून २ मोबाइल, ३ हजार रुपये रोख व बेडरूममधून एक कंडोम जप्त केले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अमिती जोगी, स्वाती जोगी व तिला या व्यवसायात ढकलणाऱ्या मीनाक्षी व सिमरन या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.