दीर- भावजयीचा "इश्क' उठला तिच्या जीवावर; पतीच्या अनैतिक संबंधामुळे तिने घेतला गळफास!
प्राप्त माहितीनुसार, दिपाली धर्मेंद्र मेहर (३२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दिपालीचा २०२१ मध्ये पहिल्या पतीशी पटत नसल्याने घटस्फोट झाला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी तिचे दुसरे लग्न आमगाव तालुक्यातील ठाणा येथील ४२ वर्षीय व्यक्तीसोबत झाले होते. त्याचेही दुसरे लग्न होते. त्याला पहिल्या पतीपासून ११ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा असे अपत्य आहेत.
लग्नानंतर केवळ १ - २ महिनेच त्याने दिपालीला चांगले वागविले. नंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. २६ जानेवारी २०२२ रोजी पतीने दिपालीला माहेरी नेऊन सोडले होते. पतीचे त्याच्या लहान्या भावाच्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचे याच काळात दिपालीला कळले. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत दिपालीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपालीने आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी सव्वा सहाला मोठी बहीण मंदाकिनीला फोन केला होता. पती आणि जाऊचे अनैतिक संबंध आहे. मानसिक तणावामुळे मला रात्रभर झोप येत नाही. या घरात जीव घुटमळतो. त्यामुळे फाशी घेण्याचा विचार येत आहे, असे तिने बहिणीला सांगितले होते. बहिणीने तिचा हा कॉल रेकॉर्डिंग करून ठेवला आहे.