विराट कोहलीला अटक करा; सोशल मीडियावर रोहित शर्माच्या चाहत्यांची मागणी! काय आहे नेमक प्रकरण वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तामिळनाडूत २१ वर्षीय तरुणाने आपल्याच एका मित्राची दारूच्या नशेत हत्या केलीय. त्यानंतर विराट कोहलीला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे. मात्र विराट कोहली चा या प्रकरणाशी संबंध काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे चाहते अशा प्रकारची मागणी करू लागले आहेत. 

त्याचे झाले असे की रोहित शर्मा श्रेष्ठ की विराट कोहली असा वाद दोन जिगरी मित्रांमध्ये झाला. हा वाद  अक्षरशः हाणामारी पर्यंत पोहचला.  तामिळनाडूतल्या अरियालुर जिल्ह्यातील पोय्युर गावातील ही घटना आहे. एस धर्मराज(२१) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून पी. विग्नेश (२४) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. एस.धर्मराज  हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा फॅन आहे तर मृतक पी. विग्नेश हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा फॅन होता.

दोघेही दारू पिलेले होते. रोहित भारी की कोहली यावरून दोघांत भांडण झाले. विग्नेश ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघावर व विराट कोहलीवर टीका केली . याचा जाम राग धर्मराज ला आला. त्यानंतर ने धर्मराज ने विग्नेश ला दारूचे बॉटल ने मारले. त्यानंतर विग्नेश च्या डोक्यात त्याने  बॅट हाणली. या हलल्यात विग्नेश चा मृत्यू झाला. या प्रकारानंतर सोशल मीडियावर चक्क विराट कोहलीच्या अटकेची मागणी होऊ लागली असून "अरेस्ट कोहली" हा  हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.