‘डिवचण्याचा प्रयत्न केल्यास बारा वाजवू’

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे देशभरातून काैतुक होत असून,त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास बारा वाजवू, असा इशारा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला. सातारा जिल्हा शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उदय सामंत बोलत होते. सामंत पुढे म्हणाले, आमच्या पक्ष नेतृत्वाला थांबविण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या मार्गाने षडयंत्र रचू लागले आहेत. पक्ष …
 

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे देशभरातून काैतुक होत असून,त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास बारा वाजवू, असा इशारा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.

सातारा जिल्हा शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उदय सामंत बोलत होते. सामंत पुढे म्हणाले, आमच्या पक्ष नेतृत्वाला थांबविण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या मार्गाने षडयंत्र रचू लागले आहेत. पक्ष वाढविणे ही चूक नाही, तर ती आपली जबाबदारी असून गाव तेथे शाखा हा शिवसेनेचा पाया आहे. शाखेतून सामाजिक काम केले, तरच पक्षसंघटना मजबूत होत असते.

ही संपर्क मोहीम आपल्या सर्वांच्या ताकदीवर राबवायची असून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे लोकहिताचे निर्णय घेतले ते या मोहिमेतून गावोगावी पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे. विकासकामांबरोबर आपण पक्ष संघटनेसाठी किती काम करतो हे महत्त्वाचे असून पक्ष संघटनेत काम करताना कोणीही विश्वासघात करणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा उपयोग जनसामान्यांच्या कामासाठी करायचा असून शिवसैनिकांनी युती, आघाडीची चिंता न करता संघटना, शाखा वाढवून त्या कार्यरत करणे गरजेचे आहे, असे शंभूराजे देसाई यांनी सांगितले.