हौसेने केला डॉक्टर पती, पण तो निघाला नपुंसक

४० लाख रुपये उकळल्याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखलमुंबई : डॉक्टरी पेशाला समाजात आजही चांगली किंमत आहे. डॉक्टर म्हटले सभ्य ’पुरुष’ म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात. त्याला जावई करून घेण्यासाठी धडपडतात. पण हाच विश्वास नवीन पनवेल येथील एका डॉक्टर युवतीच्या कुटुंबाला चांगलाच महागात पडला. धुळे जिल्ह्यातील या सभ्य एमबीबीएस डॉक्टरने आपण पुरुष नसून ’नपुंसक’ असल्याची बाब मुलीपासून व …
 

४० लाख रुपये उकळल्याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
मुंबई :
डॉक्टरी पेशाला समाजात आजही चांगली किंमत आहे. डॉक्टर म्हटले सभ्य ’पुरुष’ म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात. त्याला जावई करून घेण्यासाठी धडपडतात. पण हाच विश्वास नवीन पनवेल येथील एका डॉक्टर युवतीच्या कुटुंबाला चांगलाच महागात पडला. धुळे जिल्ह्यातील या सभ्य एमबीबीएस डॉक्टरने आपण पुरुष नसून ’नपुंसक’ असल्याची बाब मुलीपासून व तिच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली. तिच्याशी लग्न केले. वर पुन्हा दवाखाना टाकण्यासाठी ३५ ते ४० लाख रुपये उकळले. लग्नानंतर जेव्हा तो डॉक्टर नपुंसक असल्याची बाब उघड झाल्यानंतर त्या पीडित महिला व तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरविरोधात ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारआधारे खांदेर पोलिसांनी नंपुसक डॉक्टर, त्याचे आई-वडिल, बहिणीसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेल येथील एका बीएचएमएस डॉक्टरचा मार्च २०१८ मध्ये धुळे जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टरसोबत विवाह ठरला.साखरपुडा होण्याआधीच त्या डॉक्टरने मुलीच्या कुटुंबीयांना दवाखाना टाकण्यासाठी म्हणून ३०लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास लग्न आणि साखरपुडा दोन्ही मोडले जाईल, अशी धमकी त्याने मुलीच्या वडिलांना दिली.मुलीचे लग्न मोडले जाऊन समाजात बदनामी होईल या भीतीने मुलीच्या वडिलांनी प्रथम ३० लाख रुपये त्यांना दिले. नंतर आणखी पाच लाख रुपये देऊन थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नात वर्‍हाड आणणे, त्यांचे भोजन,उतरण्याची, लग्नाचा हॉल, रिशेप्शन जेवणावळी असे मिळूनजवळपास पाच ते सात लाख रुपये खर्च केला. हा सगळा खर्च तरुणीच्या वडिलांनी केला. विवाहानंतर नवदाम्पत्य सिमला-कुलु मनालीला फिरायला गेले. तेथे डॉक्टरने शरीरसंबंधांना चक्क नकार दिला. त्याबद्दल नववधूने वारंवार विचारणा केल्यावर त्याने मी शरीरसंबंध ठेवण्यास व तुला मूल देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. हे ऐकून युवतीला धक्काच बसला. ती चक्क माहेरी निघून आली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वधूपित्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच आपले हुंडा म्हणून दिलेले तसेच लग्नासाठी खर्च केलेले ४० लाख रुपये परत मिळावेत, अशी मागणी केली आहे.