स्वतः स्थापन केलेल्या बँकेविरोधात हजारे मैदानात

नगर ः राज्य व केंद्र सरकारमधील तसेच विविध संस्थांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेविरोधात मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहार गेल्या दहा वर्षांपासून गाजत असताना आणि या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल झाले असताना आता हजारे यांनी आवाज उठविला आहे. लष्कारातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी …
 

नगर ः राज्य व केंद्र सरकारमधील तसेच विविध संस्थांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आता त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेविरोधात मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहार गेल्या दहा वर्षांपासून गाजत असताना आणि या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल झाले असताना आता हजारे यांनी आवाज उठविला आहे.

लष्कारातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी एकत्र येऊन पारनेर सैनिक सहकारी बँकेची स्थापना केली. हजारेही लष्करात होते. या बँकेच्या स्थापनेत त्यांचाही मोठा वाटा होता. बँकेचा सुरुवातीला काही काळ लाैकिक होता; परंतु या बँकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची कीड लागली. जो सामाजिक नेता देश व राज्याला हादरवून टाकतो, धावायला लावतो, त्याच नेत्याने स्थापन केलेल्या बँकेत गैरव्यवहार करावा, याची जराही भीती अधिकारी, पदाधिकाऱ्यांना वाटली नाही, हे आश्चर्यच आहे. पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहारांबद्दल हजारे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल आता सहकार विभागाने घेतली असून चौकशी केली आहे. हजारे यांच्याअगोदर अनेकांनी सहकार आणि पोलिस खात्याचे उंबरठे झिजविले; परंतु त्यांना कोठेही न्याय मिळाला नाही.