राज्‍याची बातमी ः लग्नासाठी त्‍याने ठेवलेली अट ऐकूनच तिला बसला शॉक!; त्‍याच्‍या मित्राशी शरीरसंबंध ठेवावे लागणार होते…, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई : फेसबुक प्रेमातून फसवणुकीच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर येत आहेत. मुंबईत असाच प्रकार समोर आला असून, अनुसूचित जातीच्या तरुणीवर सतत १० वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या दिघा परिसरातील राहणाऱ्या व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पल्लवीचे (नाव बदलले आहे) त्याच परिसरात राहणाऱ्या हरिओम डडवाल याच्याशी फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर …
 
राज्‍याची बातमी ः लग्नासाठी त्‍याने ठेवलेली अट ऐकूनच तिला बसला शॉक!; त्‍याच्‍या मित्राशी शरीरसंबंध ठेवावे लागणार होते…, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई : फेसबुक प्रेमातून फसवणुकीच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर येत आहेत. मुंबईत असाच प्रकार समोर आला असून, अनुसूचित जातीच्‍या तरुणीवर सतत १० वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या दिघा परिसरातील राहणाऱ्या व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पल्लवीचे (नाव बदलले आहे) त्याच परिसरात राहणाऱ्या हरिओम डडवाल याच्याशी फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे अामिष दाखवून हरिओमने पल्लवीसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तो तिला मित्राच्या घरी बोलवायचा. तिथे अनेक रात्री दोघांनी सोबत घालवल्या. मात्र लग्न करणार असल्याने पल्लवीने हे सर्व सहन केले. ३ वर्षे हा प्रकार सुरू होता. त्यानंतर हरिओम एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. ही बाब पल्लवीला कळल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले. लग्नाबद्दल विचारल्यावर हरिओम टाळाटाळ करू लागला.

तुला माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला माझा मित्र करण कांबळे याच्याशी संबंध ठेवावे लागतील, असे हरिओम तिला म्हणाला. लग्नाच्या आशेने ती यासाठीसुद्धा तयार झाली. करणसोबत संबंध ठेवत असताना हरिओमने त्यांच्या संबंधाचे चित्रिकरण केले व फोटो काढले. या व्हिडिओ व फोटोंच्या आधारावर तो व करण तिच्यावर पुन्हा पुन्हा लैंगिक अत्याचार करू लागले. करणसोबत अनेकदा संबंध ठेवूनही हरिओम लग्नासाठी तयार झाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिसांत हरिओम डडवाल (२७) आणि करण कांबळे या दोघांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.