राज्‍याची बातमी ः ब्‍युटिशियन तरुणीवर पीएसआयचा लैंगिक अत्‍याचार!; लग्‍नाबद्दल विचारल्यावर म्‍हणाला….

पुणे : पोलीस उपनिरीक्षकाने २५ वर्षीय ब्युटिशियन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पीडितेने याप्रकरणाची तक्रार कोथरूड पोलीस ठाण्यात दिली असून, तक्रारीवरून पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण रमेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. जर्दे सध्या येरवडा येथे वाहतूक विभागात …
 
राज्‍याची बातमी ः ब्‍युटिशियन तरुणीवर पीएसआयचा लैंगिक अत्‍याचार!; लग्‍नाबद्दल विचारल्यावर म्‍हणाला….

पुणे : पोलीस उपनिरीक्षकाने २५ वर्षीय ब्‍युटिशियन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पीडितेने याप्रकरणाची तक्रार कोथरूड पोलीस ठाण्यात दिली असून, तक्रारीवरून पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण रमेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. जर्दे सध्या येरवडा येथे वाहतूक विभागात कार्यरत आहे. तो कोथरूड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मे २०१८ मध्ये त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाली. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे तो तरुणीला सांगत होता.

लग्नाचे आमिष दाखवून जर्देने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्‍याचार केला. यासाठी तो तिला लॉजवर न्यायचा. तिने लग्नाबद्दत जर्दे याला विचारणा केली असता “मी पोलीस अधिकारी आहे. माझे कुणीही वाकडे करू शकत नाही. मी सर्व प्रकरण मॅनेज करू शकतो’, अशी धमकी त्‍याने तरुणीला दिली व मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.