“या’ पक्षाला वगळून महाराष्ट्रात सत्ता?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे शंका आणि राजकारणात काहीही घडण्याची शक्यता असे मानले जाते. मागच्या वेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच आैटघटकेचे सरकार आले. आताही पवार यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केल्यामुळे महाराष्ट्रात वेगळे राजकीय समीकरण तयार होऊन काँग्रेसला वगळून …
 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे शंका आणि राजकारणात काहीही घडण्याची शक्यता असे मानले जाते. मागच्या वेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच आैटघटकेचे सरकार आले. आताही पवार यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केल्यामुळे महाराष्ट्रात वेगळे राजकीय समीकरण तयार होऊन काँग्रेसला वगळून सरकार तयार होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पवार आणि मोदी यांच्यात आज सुमारे तासभर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत हवापाणी आणि गावगप्पा झाल्या असण्याची शक्यताच नाही. त्याशिवाय प्रशासकीय कामांसाठी पवार यांना मोदी यांची भेट घेण्याची गरजच नाही. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची भेट घेतल्यानंतर पवार यांनी लगेच मोदी यांची भैट घेण्यामागे राजकीय समीकरणे नव्याने जुळविणण्याचा तर प्रयत्न्ही नाही ना, अशी शंका राजकीय तज्ज्ञांना येते. गेल्या दोन दिवसांत पवार यांच्या पियूष गोयल, राजनाथ सिंह आणि आता मोदी यांच्याशी गाठीभेटी झाल्या. त्यामुळे वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.