मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे झाले होते बाधित
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गृहआघाडीवर टेन्शन वाढले आहे. चिरंजीव आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिकारी सू़त्रांनी मंगळवारी ही माहितीr दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी मुंबईत जे.जे. इस्पितळात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली होती.त्यानंतर सोमवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.बीएमसीच्या अधिकार्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यात रश्मी ठाकरे यांचीची चाचणी घेण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून कोणताही त्रास जाणवत नाही व काळजी करण्यासारखे काही नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांना दुसर्यांदा कोरोना
राज्यात आघाडी सरकारमधील अनेक मंत्री,आमदारांना कोरोना झाल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे.ठाकरे मंत्रिंमंडळातील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे हे कोरोना बाधित आले असून त्यांना दुसर्यांदा या आजाराचा संसर्ग झाला आहे.मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे व आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.