पंढरपुरात राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम! ; भाजपचे समाधान आवताडे विजयी

– राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा निसटता पराभव– भालकेनानांच्या मुलाला विठ्ठल पावलाच नाही!पंढरपूर : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली असून, भगीरथ भालके यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे समाधान आवताडे हे 3716 मतांनी विजयी झाले आहेत. पंढरपूर येथील जाहीर सभेत विरोधी पक्षनेते …
 

– राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा निसटता पराभव
– भालकेनानांच्या मुलाला विठ्ठल पावलाच नाही!
पंढरपूर :
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली असून, भगीरथ भालके यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे समाधान आवताडे हे 3716 मतांनी विजयी झाले आहेत.

पंढरपूर येथील जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो, असे आवाहन केले होते. या आवाहनाला पंढरपूर-मंगळवेढाच्या जनतेने प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या विजयानंतर पंढरपूरचा विजय हा महाविकास आघाडीच्या सणसणीत थोबाडीत असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्व. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती. या शिवाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर अवताडे हेदेखील मैदानात होते. शैला गोडसे या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या असल्याने त्यांची उमेदवारी बंडखोरी मानली जात आहे. या निवडणुकीची मतमोजनी रविवारी सकाळी सुरु झाली. सकाळपासून भाजला कौल दिसून येत होता. दिवसभरातील चढउतारानंतर आवताडे हे 3716 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मूळ पंढरपुरातच भगीरथ भालके यांना मती मते पडलेली आहेत. विशेष बाब म्हणजे, गतनिवडणुकीत स्व. भारतनाना भालके यांना पंढरपूरने तब्बल सहा हजार मतांचा लीड दिला होता. याचा अर्थ नानांचे पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरचे नाकारले आहे.