खरंच अण्णा हजारे झोपले का?…विचारल्यावर अण्णांनी दिले “हे’ उत्तर

अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर एक प्रश्न सारखा विचारला जातोय. “आता अण्णा कोठे गेले, झोपले काय?’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या टीकावजा अपेक्षेला अखेर उत्तर दिले आहे. जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. यामुळेच सरकार स्वतःला हवे ते करतेय. जनता जागी व्हावी तरच प्रश्न सुटतील, असे ते म्हणाले. माझे वय ८४ वर्षे झाले आहे. कधीपर्यंत मी …
 
खरंच अण्णा हजारे झोपले का?…विचारल्यावर अण्णांनी दिले “हे’ उत्तर

अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर एक प्रश्न सारखा विचारला जातोय. “आता अण्णा कोठे गेले, झोपले काय?’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या टीकावजा अपेक्षेला अखेर उत्तर दिले आहे. जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. यामुळेच सरकार स्वतःला हवे ते करतेय. जनता जागी व्‍हावी तरच प्रश्न सुटतील, असे ते म्‍हणाले. माझे वय ८४ वर्षे झाले आहे. कधीपर्यंत मी लढू? असा सवालही त्‍यांनी केला आहे.

देश बचाव जनआंदोलन समितीने पुण्यात पत्रपरिषद घेऊन देशातील सध्याच्‍या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी भूमिका मांडावी, असे आवाहन केले होते. आंदोलनासाठी अण्णांनी पुढे यावे, अशी अपेक्षाही व्‍यक्‍त केली होती. त्‍यावर अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे. समितीने राळेगणसिद्धीत येऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अण्णांनी समितीला चर्चेसाठी पाचारण केले हाेते. यावेळी अण्णांनी भूमिका मांडली. काही युवकांनी एकत्र येऊन देश बचाव जनआंदोलन समिती स्थापन केली याबद्दल त्‍यांनी अभिनंदनही केले. तुम्ही आंदोलन उभारा, मी नक्‍कीच सोबत येईल, असेही अण्णा म्‍हणाले. मी झोपलेलो नाही. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याकडे संपर्कच केला नाही, असेही त्‍यांनी सांगितले.