माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

नगरमधून होते भाजपचे तीनवेळा खासदार नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते व नगर जिल्ह्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले माजी खासदार दिलीप गांधी (७०) यांचे नवी दिल्ली येथे बुधवारी (दि.१७) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांनी केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. कोरोना …
 

नगरमधून होते भाजपचे तीनवेळा खासदार

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते व नगर जिल्ह्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले माजी खासदार दिलीप गांधी (७०) यांचे नवी दिल्ली येथे बुधवारी (दि.१७) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांनी केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. कोरोना नियमामुळे त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार आहेत. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. वाजपेयी सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. ते संघाचे जुने कार्यकर्ते होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना डावलून डॉ.सुजय विखेंना उमेदवारी दिली होती व ते तेथून निवडूनही आले होते. नगर अर्बन सहकारी बँकेचे गांधी काही काळ अध्यक्ष होते व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशीही होणार होती. बोगस कर्जवाटप प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याआधीच त्यांचा कोरोनाने बळी घेतला.