भाजपाची पिछेहाट सुरू : महसूल मंत्री नामदार थोरात; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा बद्दल जनतेत मोठा रोष

संगमनेर : कोरोनाच्या मोठ्या संकटात कोरोनाशी लढण्याऐवजी भारताचे पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत. लोकांना शाश्वत विकास पाहीजे भूलथापा व जाहिरातबाजी नको आहे. म्हणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा बद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून भाजपाची पिछेहाट सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार …
 

संगमनेर : कोरोनाच्या मोठ्या संकटात कोरोनाशी लढण्याऐवजी भारताचे पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत. लोकांना शाश्वत विकास पाहीजे भूलथापा व जाहिरातबाजी नको आहे. म्हणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा बद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून भाजपाची पिछेहाट सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाबाबत बोलताना नामदार थोरात म्हणाले की , जनतेला शाश्वत विकास व सुरक्षितता हवी आहे. मात्र भाजपाने मागील सात वर्षात फक्त जाहिरातबाजी केली आहे. कोणतेही विकासाचे काम केले नाही. पेट्रोल-डिझेल च्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्वत्र बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  देशात हे सर्व मोठे प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाचे मोठे उभे संकट उभे राहिले आहे.

अशा परिस्थितीत देशातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपाचे सरकार सत्तेसाठी निवडणुकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत. देशात कोरोनाचे मोठे संकट आले आहे. यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केली असती तर या संकटावर मात करता आली असती.

ज्या मुलभूत गोष्टी आहेत त्या होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रा मध्ये रेमडिसीवर औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजनची टंचाई सर्वत्र निर्माण झाली आहे. संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोणाची लाट आली आहे. अजूनही अनेक राज्यात आवश्यक तेवढ्या तपासण्या झाल्या नाहीत. अशा मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याने भाजप कडून भारतीय जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. कोरोना संकट रोखणे हे काँग्रेस पक्षाने प्रथम ध्येय मानले आहे. याबाबत श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला विविध सूचना केली असून जनतेच्या मदती करता कृतिशील उपाययोजना केल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजय हा भाजपला मोठा चपराक देणारा आहे. एक हाती निवडणूक जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे आपण अभिनंदन करत असून इतर राज्यांमध्ये ही भाजपला रोखले जात आहे. आता तरी केंद्र सरकारने निवडणुकांच्या राजकारणा ऐवजी जनतेच्या विकासाचे राजकारण करत कोरोना संकटात नागरिकांना औषधोपचार, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून आर्थिक मदत करावी अशी मागणी ही नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पश्चिम बंगालचा विजय देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा – आमदार डॉ. तांबे

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती निवडणूक जिंकत भाजपावर मोठा दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय भाजपाच्या एकाधिकारशाही विरुद्ध असून हे यश सामान्य जनतेचा आवाज आहे. कोरोना संकटात जनतेला मदत करण्याऐवजी भाजपा या संकटात राजकारण करत आहे. त्यामुळे भाजपाचा झालेला पराभव आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा झालेला विजय हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.