“तो’ वळण रस्‍ता ठरतोय यमदूत!; “समृद्धी’च्‍या कंत्राटदाराची हलगर्जीपणा अनेकांच्‍या जिवावर

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः दुसरबीड ते मलकापूर पांग्रा डांबरी रस्त्यातून समृद्धी महामार्ग जात असल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येण्याजाण्यासाठी वळण रस्ता तयार केला आहे. मात्र या वळण रस्त्यावरून आता वाहनधारक घसरून पडत आहेत. मुरूम, गिट्टी टाकून केलेल्या या रस्त्यावर रोज अपघात घडत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या पावसामुळे वाहनधारकांना हा वळण …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः दुसरबीड ते मलकापूर पांग्रा डांबरी रस्‍त्‍यातून समृद्धी महामार्ग जात असल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्‍यामुळे येण्याजाण्यासाठी वळण रस्‍ता तयार केला आहे. मात्र या वळण रस्‍त्‍यावरून आता वाहनधारक घसरून पडत आहेत. मुरूम, गिट्टी टाकून केलेल्या या रस्‍त्‍यावर रोज अपघात घडत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या पावसामुळे वाहनधारकांना हा वळण रस्‍ता जीवघेणा बनला आहे. कंत्राटदाराचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने संताप व्‍यक्‍त होत आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. सिंदखेड राजा तहसील व जालना जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. याबाबत नायब तहसीलदार प्रवीण लटके यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले, की कंत्राटदाराला सूचना दिल्या असून, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.