शेगावमध्ये महावितरण कर्मचार्यांचा संप!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव उपविभागीय वीज वितरण कंपनीच्या वर्कर्स फेडरेशनतर्फे विज कायदा 2020 च्या विरोधात व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज, 3 फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यता आला. संपात 90 टक्क्यांच्या वर कामगारांनी सहभाग घेतला.
केंद्र सरकारचा खासगीकरणाचा डाव हाणून पडायचा निर्धार कर्मचार्यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्या कायद्याने ग्राहकांचे नुकसान तर होणारच परंतु सर्वात जास्त शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे, असे प्रतिपादन पी. एस. गायगोळ यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना केले. आंदोलनात झोनल तांत्रिक सदस्य मोहम्मद हनिफ यांच्यासह श्री. सातव, श्री. भारसाकळे, श्री. हिवराळे, नासिर देशमुख, श्री. डेहनकर, श्री. मालठाणे, श्री. भोंडेकर, श्री. सनगाळे, श्री. धुमाळे, श्री. राऊत, श्री. तेल्हारकर, श्री. शिनगारे, श्री. बेलूरकर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.