वीज कोसळल्याने बकऱ्या चारणाऱ्याचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वीज कोसळल्याने बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज ,२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कदमापूर (ता. खामगाव) शिवारात उघडकीस आली. निरंजन धोंडीराम सरकटे (५०, रा. कदमापूर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. निरंजन सरकटे हे बकऱ्या चारण्यासाठी कदमापूर शिवारात गेले होते. दुपारच्या सुमारास जोरदार …
Sep 27, 2021, 21:30 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वीज कोसळल्याने बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज ,२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कदमापूर (ता. खामगाव) शिवारात उघडकीस आली.
निरंजन धोंडीराम सरकटे (५०, रा. कदमापूर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. निरंजन सरकटे हे बकऱ्या चारण्यासाठी कदमापूर शिवारात गेले होते. दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. याचवेळी वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील अन्य मेंढपाळाच्या निदर्शनास ही बाब आल्याने गावात ही माहिती देण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.