मलकापूर ः हम करे सो कायदा… जमिनावर सुटका होताच संशयिताची काढली मिरवणूक!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापुरात 10 फेब्रुवारीला बर्थ डे पार्टीत नंग्या तलवारी नाचवून कायदा- सुव्यवस्थेला आव्हान दिल्यानंतर 15 फेब्रुवारीला या प्रकरणातील संशयिताची जमिनावर सुटका झाली. या संशयिताने पुन्हा एकदा हम करे सो कायदा याचा प्रत्यत देत चक्क पारपेठमध्ये हजारोंच्या गर्दीत मिरवणूक काढली. या गर्दीला ना मास्क होता ना सुरक्षित अंतर.. यामुळे कोरोनाविषयक सारेच नियम …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापुरात 10 फेब्रुवारीला बर्थ डे पार्टीत नंग्या तलवारी नाचवून कायदा- सुव्यवस्थेला आव्हान दिल्यानंतर 15 फेब्रुवारीला या प्रकरणातील संशयिताची जमिनावर सुटका झाली. या संशयिताने पुन्हा एकदा हम करे सो कायदा याचा प्रत्यत देत चक्क पारपेठमध्ये हजारोंच्या गर्दीत मिरवणूक काढली. या गर्दीला ना मास्क होता ना सुरक्षित अंतर.. यामुळे कोरोनाविषयक सारेच नियम पायदळी तुडवले गेले.


10 फेब्रुवारीला मलकापूरचे उपनगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमदार यांचा वाढदिवस होता. यानिमित्त पारपेठ येथील नगरपरिषद शाळेत पार्टी देण्यात आली होती. या पार्टीत युवकांनी नंग्या तलवारी नाचवल्या. स्वतःही जमदारही एका छायाचित्रात नंगी तलवार हातात घेऊन दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी जमदार यांच्यासह मेळाव्याचे आयोजक नगरसेवक अ‍ॅड. जावेद कुरेशी, जावेद खान ईस्माईल खान (21, रा. ताजनगर, पारपेठ), मो. शोएब मो. अहमद (31, रा. ताजनगर, पारपेठ), मो. फैजुररहेमान मो. सैफुरहेमान (25, रा. पिलुतकीया), शेख इमाम शेख आजम (25, रा. पिलुतकीया, पारपेठ) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 15 फेब्रुवारीला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी न्यायालयाने सहाही आरोपींची जामिनावर सुटका केली. मुक्तता होताच जमदार पारपेठमध्ये पोहोचले तेव्हा हजारोंच्या संख्येने समर्थक जमले आणि त्यांनी सुटकेचा जल्लोष केला. जल्लोषात मिरवणूक काढली. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने अशा पद्धतीने मिरवणूक काढल्याने आता हम करे सो कायदा याचीच प्रचिती मलकापुरात येत आहे.