मराठा पाटील युवक समितीतर्फे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक दिन सोहळा मराठा पाटील युवक समितीतर्फे शेगावमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
समितीच्या शहर कार्यकारिणीची बैठक 16 जानेवारीला झाली. तत्पूर्वी राज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. समितीच्या संभाव्य वाटचालीवर बैठक चर्चा करण्यात आली. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा पाटील युवक समितीचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटील, तालुका संघटक नितीन कराळे, जिल्हा समिती सदस्य विठ्ठल अवताडे पाटील, ज्ञानेश्वर ढोले, सहसचिव दत्ता पाटील खोंड, कोषाध्यक्ष ईश्वर पाटील, संघटक अमोल कराळे, दत्ता वडतकार, सूर्यकांत कडाळे, संपर्कप्रमुख बळीराम लांजुळकार, सदस्य अमर वारोकर, अमोल हिंगणे, गणेश गोळे, अंकुश पाटील, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष ऋषभ पाटील, उपाध्यक्ष गौरव पाटील लांजुळकर, सहसचिव युवराज शेजोळे, संघटक धनंजय शेजोळे, अभय खुमकर, सदस्य प्रवीण डोसे, गजानन भांबेरे, योगेश भांबेरे, भूषण लांजुळकर आदी उपस्थित होते.