…तर नांदुरा पोलीस करणार कठोर कारवाई; ठाणेदारांचे संकेत
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, संचारबंदीतील नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. तसे संकेत नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिले. श्री. नाईकनवरे सार्वजनिक ठिकाणी माक्सचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे, सॅनिटायझर वापर करणे, हात …
Feb 18, 2021, 16:08 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, संचारबंदीतील नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. तसे संकेत नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिले.
श्री. नाईकनवरे सार्वजनिक ठिकाणी माक्सचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे, सॅनिटायझर वापर करणे, हात स्वच्छ धुणे आदी नियम पाळावेत. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. कुठलीही यात्रा, उत्सव व लग्नसमारंभात 50 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. कुठल्याही प्रकारची मिरवणूक, रॅली आदींवर बंदी घालण्यात आली आहे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री. नाईकनवरे म्हणाले.