पातोंडा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप!;येणाऱ्या-जणाऱ्या वाटकरूंना नाहक त्रास..!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पातोंडा गावात जणाऱ्या मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. 
पातोंडा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी मोठ-मोठे गड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत आहे.या रस्त्याने जवळपास सर्व गाव ये - जा करत असते.हे पाणी ठिकठिकाणी साचल्याने गावात डासांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान पोरं, वृद्ध आजारी पडून रोगराईची गंभीर समस्या उद्भवू शकते. ही समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित प्रशासन यांनी लवकरात - लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक गावकरी करीत आहेत.