खामगाव शहरात शतकाची परंपरा असलेल्या शांती महोत्सवाला आजपासून सुरवात!किती दिवस चालणार शांती महोत्सव बातमीत वाचा..
Oct 16, 2024, 18:51 IST
खामगाव:( भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा मोठी देवी) खामगाव शहरांत उत्साहात साजरा करण्यात येतो.
कोजागिरी पोर्णिमे पासून अकरा दिवस चालणाऱ्या या मोहत्सवात देशातील विविध राज्यातून भाविक खामगाव येथे दाखल होत असल्याने या उतासावचे महत्व आजपर्यंत देखील अबाधित आहे. आज बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर पासून शांती मोहत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात मोठ्या देवीची कोजागिरी पोर्णिमेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असते. या दिवसापासून पुढील अकरा दिवस हा उत्सव चालतो. विजयादशमी'ला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो.म्हणूनच देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो.
हा उत्सव फक्त खामगाव शहरात साजरा होत असल्याने या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळी परंपरा हा उत्सव राखून आहे.देवीच्या दर्शनासाठी २४ तास दरबार खुला असतो. यासह देवीच्या दान केलेल्या साड्या, पातळे , चोळ्या यांचे गरजूंना वाटप करण्यात येत असते.