बोलेरो पिकपने दुचाकीला ठोकले; दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर !दाताळा - पिंपरी गवळी रोडवर झाला अपघात

 
दाताळा:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील दाताळा पिंपरी गवळी रोडवर काल २३ डिसेंबरच्या रात्री भीषण अपघात घडला. बोलेरो पिकप व दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमीन शेख हफिन(४७ वर्ष), शेख रशीद शेख कालू (५५ वर्ष) असे मृतकांचे नाव आहे. तर त्यांच्याच सोबत असणारे सलीम खा बुडन खा (३०वर्ष) गंभीर जखमी असून त्यांच्यावर मलकापूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री ९ वाजेदरम्यान तिघे गवंडी काम आटोपून मलकापुरातून निघाले. तिघेही माकोडी गावाचे रहिवासी आहेत. एम एच.२८ एच २१७३ असा दुचाकीचा क्रमांक आहे.घरी जात असतानाच दाताळा पिंपरी गवळी रोडवर बोलोरो पिकपची आणि त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली व भीषण अपघात घडला. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान धडक दिल्यानंतर पिकपचालक घटनास्थळातून फरार झाल्याची माहिती आहे.