राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या सोनाळा शाखेचा शुभारंभ! धान्य गोदाम भूमिपूजन; बचतगटांना अर्थसहाय्य

 

सोनाळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था (मर्या.शिरपूर)च्या सोनाळा  शाखेचा शुभारंभ आणि धान्य गोदामचा भूमीपूजन सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या वतीने महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. 

js

याप्रसंगी माजी उपजिल्हाधिकारी तथा अभिता लॅण्ड सोल्युशन्स प्रा.लि. कंपनीचे सीईओ सुनिल शेळके,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड.जयश्रीताई शेळके, संस्थेच्या संचालक अर्चनाताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना भाऊसाहेब शेळके म्हणाले की, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेने शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही  सर्वोत्तम सेवा देण्यास संस्था कटीबद्ध आहे. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी संस्थेच्या विविध योजना आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. सोनाळा परिसरातील ग्राहक, खातेदार, ठेवीदार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली. महिला बचतगटांनी घेतलेल्या भांडवलाचा वापर व्यवसाय उभारणीसाठी करावा. बाजारपेठेचा वेध घेऊन व्यवसायात नवनवीन प्रयोग करावे. याद्वारे व्यवसाय वृद्धिंगत  करुन प्रगती साधावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केले. इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. 

यावेळी वासाडी येथील नवदुर्गा महिला बचतगटाला ४ लाख रु.,विंद्यवासनी महिला बचत गट, हड्यामाल (वसाडी) ४ लाख ८० हजार रु., भवानी महिला बचत गट, वारी हनुमान ४ लाख ८० हजार रु. तसेच रोहिनखिडकी येथील शिवशक्ती महिला बचतगटास ३ लाख २० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करण्यात आले. 

sss

                                जाहिरात👆

कार्यक्रमाला  सोनाळा ठाणेदार सागर भास्कर,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सरपंच हर्षल खंडेलवाल, उपसरपंच रशीदभाई, ऑडिटर दीपक जाधव, श्रीकृष्ण दाभाडे, दिनकर राहणे, रमेश अग्रवाल, स्वप्नीलबापू देशमुख, धनंजय बाहेकर, स्थानिक संचालक प्रमोद खोद्रे, संजय गावंडे, ज्ञानेश्वर कोठे, शेख अफरोज, गौरव खंडेलवाल, सुनिल राहणे, ॲड.पवन अग्रवाल, सुनिल वेरुळकार, ललित सावळे, अंकुश कुकडे, नीलेश जैस्वाल, वैभव दातीर, अमित घोडेस्वार, माणिकराव राऊत, राहुल मोरे, युवराज देशमुख यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन योगेश महाजन यांनी केले