विदर्भाची पंढरी शेगावात श्री रामनवमी उत्सव! भाविकांची अलोट गर्दी; थेट शेगावातून ज्ञानेश्वर ताकोते पाटील सांगतात...

 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गण गण गणात बोते च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे श्री रामनवमी चा उत्सवानिमित्त लाखो भाविक आज शेगावात दाखल झाले आहेत.  संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगाव येथे येत आहेत.

tai add

 ७५० पेक्षा  अधिक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. आज सकाळी ५ ला काकडा आरती झाली, तर ७ वाजता मुख्य आरती झाली असून, दुपारी श्रीचां रजत मुखवटा पालखी सोहळा व नगर परिक्रमा होणार आहे.श्री संत गजानन महाराज जेव्हा पासून शेगाव मध्ये आले होते , तेव्हा पासूनच शेगावात रामनवमी उत्सव साजरा केल्या जातो. तेव्हा पासून आज पर्यंत अव्याहत पणे हा उत्सव सुरूच आहे. आज शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पहायला मिळत आहे . संस्थांच्या व्यवस्थापनाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले असून, सर्व भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, सर्व भक्तांना लवकर व शिस्तीत दर्शन घेता यावे याकरिता सुरळीत व्यवस्था मंदिर च्या वतीने करण्यात आली आहे, ठिकठिकाणी मंदिर चे सेवाधारी उभे असताना दिसत आहेत. तसेच श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त संतनगरी शेगाव सजली असून सर्व मुख्य रस्त्यांवर भगवामय वातावरण पाहायला मिळत आहे, सध्या दर्शन साठी ३ तासाचा कालावधी लागत असून, मुखदर्शनाकरिता २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. प्रशासनाच्या वतीने सुद्धा भाविकांची गर्दी पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त जागोजागी लावण्यात आला आहे.