संत भोजने महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव यंदाही साधेपणानेच
सप्ताहात रोज रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सेवा देत असतात. संस्थानचे अध्यक्ष खामगावचे आमदार आकाश फुंडकर हेसुद्धा या ठिकाणी रोज रात्री श्री हरिकीर्तनाचा लाभ घेण्यासाठी हजर असतात. संस्थानचे मार्गदर्शक रामायणाचार्य विदर्भरत्न ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांचे काल्याचे कीर्तन या ठिकाणी शेवटच्या दिवशी होत असते. नगरप्रदक्षिणा कार्यक्रम शेवटच्या दिवशी असतो. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.
कार्यक्रमास लाखो भाविक सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र यावर्षीसुद्धा कोरोनामुळे हा भव्य कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अत्यंत सध्या पद्धतीने हा सोहळा होत आहे. श्री क्षेत्र अटाळी गावापुरता हा पुण्यतिथी महोत्सव या वर्षी साजरा होत आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. श्री संत भोजने महाराजांच्या आशीर्वादाने कोरोना महामारीच्या संकटातून सर्व जगाला बाहेर पडण्याची सर्वांना शक्ती मिळो व पुढील येणाऱ्या वर्षात हा पुण्यतिथी महोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.