कुणबी समाज सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन २६ डिसेंबरला
Nov 25, 2021, 17:44 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणबी समाज सोयरीक पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा २६ डिसेंबरला आयोजित केला आहे. यासाठी उपवर युवक- युवतींच्या नावाची नोंदणी सुरू झाली आहे.
गेल्या १८ वर्षांपासून येथील कुणबी समाज विकास मंडळातर्फे समाजातील उपवर युवक- युवतींचे लग्न जुळवण्यासाठी आकर्षक व बहुरंगी असलेली सोयरिक पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. यासाठी समाजातील लोकांचे बहुमूल्य योगदान मिळत असून, यावर्षी उपवर युवक युवतींच्या नावाची नोंदणी गावागावात सुरू आहे. ५ डिसेंबर २०२१ ही नावनोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख असून, तारखेपर्यंत उपवर युवक- युवतींच्या पालकांनी नावनोंदणी कराव, असे आवाहन कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम काळणे, सचिव मनोहर थेटे आणि संचालकांनी केले आहे.