'श्रींच्या' पालखी सोहळ्या निमित्ताने शेगावला जाणाऱ्या भाविकांना पोलिसांनी दिल्या "या" सुचना! वाहतूक मार्गात देखील केला बदल..

 
police

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) 'श्रींच्या' पालखी सोहळ्या निमित्ताने शेगावला जाणाऱ्या भविकांनो चोरट्यांपासून सावधान राहा,पालखी सोहळ्याच्या वाहतून मार्गात काही बदल करण्यात आला आहे. हा बदल कसा असेल याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

श्रींच्या पालखीचे आज, २३ जुलै रोजी खामगाव शहरामध्ये आगमन झाले आहे. उद्या सोमवार २४ जुलै रोजी पहाटे चार वाजता शेगावकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे. यावेळी लाखो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शेगावला जातात. यावेळी चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांनी दाग - दागिने घालू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी शनिवारी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेली श्रींची पालखी २३ जुलै रोजी खामगाव शहरात येत आहे. यामुळे कुठे 'ट्राफिक' चा प्रश्न येऊ नये, याकरिता खामगाव शहरातील वाहतून खालील प्रमाणे वळविण्यात आली आहे.

दोन दिवस असा असेल पर्यायी मार्ग

सध्याचा बाळापूर नका ते एसटी बस स्थानक खामगाव आहे. हा मार्ग २३ जुलै रोजी बाळापूर नाका - जनुना ढाबा - घाटपुरी नांदुरा रोड - एमआयडीसी टर्निंग - सुटळा बु - जलंब नाका ते बस स्टँड खामगाव वळविण्यात आला आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. २४ जुलै ला खामगाव ते शेगाव रोडवरील वाहतूक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे. पर्यायी मार्ग खामगाव बस स्टँड ते शेलोडी मार्गे शेगाव , खामगाव बस स्टँड ते खेर्डा मार्गे शेगाव ठेवण्यात आला आहे.

कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, २२४ पोलीस कर्मचारी, तसेच सध्या वेशातील २५ पोलीस कर्मचारी यांच्यासह पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.