याला म्हणतात गाव..! अवैध धंद्याच्या विरोधात सरपंच, उपसरपंच, गावकरी एकवटले!!; बेमुदत उपोषण सुरू
नांदुरा तालुक्यात खळबळ
Updated: Dec 23, 2021, 21:32 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील शेंबा बुद्रूक येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील अवैध धंद्याविरोधात एल्गार पुकारला आहे. गावातील अवैध धंदे बंद करावे यासाठी आज २३ डिसेंबरपासून गावाच्या बसस्थानकावर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
१८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने बोराखेडी पोलिसांना अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. गावात अवैध धंद्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. तरुण मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध धंदे बंद करण्यासाठी तसा ठरावही घेतल्याचे पोलीस प्रशासनाला अवगत करून दिले होते. मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करून सरपंच ॲड. नंदकिशोर खोदले, उपसरपंच जगन्नाथ भोपळे यांच्यासह सदस्य व गावकरी उपोषणाला बसले आहेत.