गाव व्हय की तलाव?लाखनवाडा बु.गावात भर रस्त्यात ठिकठिकाणी सांडपाणी थांबत असल्याने नागरिक त्रस्त!
Feb 11, 2024, 09:21 IST
खामगांव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लाखनवाडा बु गावात ठिकठिकाणी भर रस्त्यात सांडपाणी थांबत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
लाखनवाडा ग्रामपंचायत अंतर्गत राजकारणामुळे गावातील अनेक विकास कामे रखडली आहेत. गावातील सांडपाणी भर रस्त्यावर वाहत असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे गावाला भर रस्त्यात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहताना दिसत आहे. गावातील नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतला लेखी - तोंडी सांगितले असूनही मुजोर अधिकारी कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत.संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देवून गावतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. गावातील रस्त्यात थांबणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी स्थानिकांची मागणी आहे.