मित्रांसोबत विहिरीवर पोहायला गेला अन् जीव गमावला! खामगाव तालुक्यातील वझर येथील घटना..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वझर शिवारात घडली.
वझर येथील विकास शंकर वाकोडे (२३) हा सोमवार १३ मे रोजी गावातील काही मित्रांसोबत शासकीय पाण्याच्या विहिरीत पोहायला गेला होता. दरम्यान पोहतांना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्या नंतर गावकऱ्यांची या ठिकाणी गर्दी झाली होती.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.