रात्रीस खेळ चाले!रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले! वनविभागाची कारवाई

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवैध रेती उपसा आणि वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करत दोघांविरूद्ध कारवाई केली आहे.
खामगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या तालुक्यातील कवळगाव येथे वनक्षेत्र कक्ष 'अवैधरित्या रेतीचा उपसा ५१० मध्ये नाल्यातून अवैधरित्या रेतीचा उपसा करुन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास छापा टाकला असता रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रॅक्टर जप्त करुन मनोज प्रभाकर धुरंदर (वय २३) व रवीकुमार दिनकर धुरंदर (वय ३४) दोघे रा. वडजी ता. खामगाव यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) वनअपराध अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई उपवनसंरक्षक श्रीमती गवस, सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम. आर. आंग्रे, वनरक्षक बी. जी. जोशी, वनरक्षक जी. पी. पालवे, वनरक्षक एस. एस. पवार, वाहन चालक मिलिंद इंगळे, वाहन चालक बी. एम. बांद्रे, वनमजुर शिवाजी उमाळे, सुधाकर पवार यांनी केली. पुढील तपास वनपाल एम. आर. आंग्रे करीत आहेत.