दारू पिऊन वाहन चालवणे जीवावर बेतले! पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या व्यक्तीवर केला गुन्हा दाखल..

 
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 
दारू पिऊन वाहन चालविणे एकाच्या जीवावर बेतल्याची घटना २८ ऑक्टोबरच्या दुपारी साडेतीन वाजता हिंगणा दादगांव ते नारखेड रोडवर घडली.
हिंगणा दादगांव येथील रहिवासी असलेले विष्णू किसन खोंड (वय ४५ वर्ष) हे त्यांच्या ताब्यातील स्कुटीने हिंगणा दादगाव येथून नांदुऱ्याकडे येत होते. हिंगणा दादगांव ते नारखेड रोडवरील असलेल्या सत्यम टेलर यांच्या शेताजवळील वळणावर भरधाव वेगात असलेल्या स्कुटीचा अपघात झाला.
   यामध्ये विष्णुच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३०४ ( अ), ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस अंमलदार पोहेकर हे करीत आहेत.