खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा घोळ! ३२ लाखांची खोटी बिले काढून पैसे खाल्ले! सभापती, संचालकांसह १६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुरक्षारक्षक कामावर नसताना सुद्धा तब्बल ३२ लाखांची खोटी बिले काढल्याच्या कारणावरून, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालकांसह एकूण १६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,संचालक यांनी सुरक्षा रक्षक कामावर नसताना सुद्धा तब्बल ३२ लाखांची खोटी बिले काढल्याने सभापती,सचिव, कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये १६ जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल अरबट संचालक सम्यक साक्षी सेक्युरिटी अँड लेव्हल कंत्राटदार (रा. वाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता बिले काढून ३२ लाखांचा अपहार करण्यात आला आहे. अपहारानंतर मीटिंगमध्ये या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद शामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, हिंमत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली दिलीप मुजुमले, सचिन गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंह जाधव, निरीक्षक विजय इंगळे, लोखपाल गिरीश सातव यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण नाचणकर करीत आहेत.