बाब्बो..! एरवी असतो बिळात,गवतात, अडगळीच्या जागेत; आता चक्क धावत्या एसटी बस मध्ये निघाला साप! शेगाव पंढरपूर बसमधील घटना; प्रवाशांनी जीव मुठीत धरला....

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..एरवी गवतात, बिळात, अडचणीच्या ठिकाणी दडून बसणारा नागोबा चक्क धावत्या एसटी बस मध्ये निघाला अन् सर्वच प्रवाशांनी जीव मुठीत धरला...शेगाव वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या एसटी बस मध्ये आज,२८ ऑगस्टच्या सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
बस शेगाव वरून पंढरपूर कडे जात होती. बसच्या मागील भागात एक स्टेफनी ठेवण्यात आली होती, त्यात एक मोठा साप असल्याचे प्रवाशांचे निदर्शनास आले.त्यामुळे एकच खळबळ उडाली.चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बस अटाळी फाट्यावर थांबवली, सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले त्यानंतर सर्पमित्राच्या माध्यमातून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले..