शेतकऱ्यांना चुना लावणाऱ्या जग्गू डॉन शी संबंधित सर्व मालमत्ता जप्त होणार! पोलीस यंत्रणेकडून कायदेशीर प्रक्रिया सुरु;

शेतकऱ्यांना फसवून जग्गू डॉन ने केलेली कमाई पाहून पोलिसही चक्रावले! वाचा जग्गू डॉन ने काय काय कमावलं....

 
मलकापूर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क):
जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुन मिळालेल्या पैश्यांतून खरेदी केलेली काही मालमत्ता मलकापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे, काही मालमत्ता ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रकीया पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे.
Ks
आरोपी जग्गू डॉनने बरीच रक्कम कापूस खरेदी करणाऱ्या दलालांना दिली आहे. तर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणाऱ्या दलालांनी आरोपीने दिलेली रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली की नाही, याचाही तपास सुरु केला आहे. सदर दलालांना आरोपीने दिलेली रक्कम ही २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदोज पोलीस यंत्रणेकडून वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पाटील व तपास अधिकारी सुरेश रोकडे तपास करीत आहेत. ३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ४२०, ४०६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपी जगन ऊर्फ जग्गु रामचंद्र नारखेडे रा. भालेगाव याला २१ डिसेंबर रोजी मध्यप्रदेश येथून ताब्यात घेवून अटक केली करण्यात आली होती. 
शेतकऱ्यांना फसवून जग्गूने केली बम्म कमाई..
याप्रकरणी फरार आरोपीने खरेदी केलेल्या संशयीत नकली नोटा छापण्याच्या तीन मशीन व त्याचे सुटे भाग जप्त केलेल्या आहेत. त्यांची किंमत २० लाख रूपये आहे. आरोपीने त्याची पत्नी जयश्री जगन नारखेडे हिचे नावे श्रीनिवास अपार्टमेंट मलकापूर येथे दोन शटरचे गाळे असलेले दुकान खरेदी केले असून त्याची किंमत २५ लाख रूपये आहे. आरोपीने त्याची पत्नी व आरोपी असे दोघांचे नावे ग्राम भालेगाव येथे साडेतीने ते चार एक्कर शेती घेतलेली असून त्याची किंमत ७० लाख रूपये आहे. मलकापूर शहरमधील बद्री कॉम्लेक्स मधील एक फलॅट खरेदी केला असून तो आरोपीचे पत्नीचे नावे असून त्याची किंमत ३० लाख रूपये आहे. आरोपी जग्गू डॉन याने त्याचे गावातील सात आठ लोकांनी मिळून अकोला जिल्ह्यामध्ये सोलर प्रकल्प उभारला आहे. त्यामध्ये आरोपीने २ कोटी रूपये गुंतवलेले आहेत. बोदवड जि. जळगाव येथे खंडेलवाल जिनींग खरेदी करण्याची सौदापावती केलेली असून त्याची किंमत २ कोटी रूपये आहे. एक एमजी हेक्टर कार खरेदी केली असून त्याची किंमत ३१ लाख रूपये आहे. तसेच आरोपीने बऱ्याच प्रमाणात रक्कम कापूस खरेदी करणारे दलालांना दिली असून सदर रक्कत ही २० ते २५ कोटी रुपयांपर्यत आहे. एकूण आरोपीने आतापावेतो ५ कोटी ७६ लाख रूपयांची यांची मालमत्ता खरेदी केलेली आहे. सदर सर्व मालमत्ता पोलिसांकडून कायदेशीर मार्गाने जप्त करण्याची प्रकीया सुरु आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
ठाणेदार विलास पाटील म्हणतात...
पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा छापण्याच्या मशीनचा वापर आरोपीने नकली नोटा छापण्याकरीता वापर केला आहे का? याबाबत पोलिसांनी सदर मशीनमधुन जप्त करण्यात आलेल्या दोन हार्डडिस्क व एक सी.डी. ही तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविली आहे. त्यांचा अभिप्राय प्राप्त होताच सदर गुन्ह्यात वाढ होण्याची व आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आरोपी जगन नारखेडे याने ज्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुन पैसे दिलेले नाहीत. त्या शेतकऱ्यांनी रितसर तक्रार पोस्टेला नोंदवावी, जगन नारखेडे हा घरुन फरार झाला, त्यावेळी त्याचे घरून शेतकरी वा गावातील लोकांनी जे काही कागदपत्रे तसेच दस्ताऐवज तसेच इतर किंमती वस्तू घेवून गेले असल्यास वा कोणी घेवून गेले याबाबत माहिती पोलिसांना द्यावी किंवा घेवून गेलेले कागदपत्रे व किंमती वस्तू पोलीस स्टेशनला गुन्ह्याचे तपासकामी आणून द्याव्यात'" असे आवाहन ठाणेदार विलास पाटील यांनी केले आहे.