खामगावात वाघ दिसला रे भो!..; नागरिकांत दहशत! पहा व्हिडिओ

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेळघाटात, सातपुड्यात दिसणारा वाघ चक्क खामगाव शहरातच दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. खामगावच्या गाडगे बाबानगरातील महाकाल चौक परिसरात वाघाचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
 

पहा व्हिडिओ ः 

खामगाव येथील गाडगे बाबानगरातील प्रा. राजपूत यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आज, ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेचारला वाघ कैद झाला. घरासमोरून जाणारा वाघ पुन्हा परत फिरताना कॅमेऱ्यात दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक शोधकामासाठी गाडगे बाबानगर भागात दाखल झाले. मात्र अजून ठोस काहीच हाती लागले नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. आसपास कोणतेही मोठे जंगल नसताना भर मानवी वस्तीत वाघाचा शिरकाव झालाच कसा याबद्दल परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र हा वाघ आहे की बिबट्या हे अजून समोर आले नसून तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ यांनी सांगितले.