१८ वर्षीय तरुणी मध्यरात्री पुस्तके घेऊन कुठे गेली असेल? पोलिसांना पडला प्रश्न; खामगाव तालुक्यातील घटना!
Apr 15, 2022, 20:12 IST
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १८ वर्षीय तरुणी मध्यरात्री पुस्तके व कपडे घेऊन गायब झाली. खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आज, १५ एप्रिल रोजी पिंपळगांवराजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
पिंपळगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १८ वर्षीय मुलगी १४ एप्रिलच्या रात्री तिच्या आईजवळ झोपली होती. तिचे आई वडील सकाळी उठले असता मुलगी दिसली नाही. मध्यरात्री ती शाळेची बॅग ,पुस्तके आणि कपडे घेऊन गायब झाल्याचे समोर आले. तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर आज, १५ एप्रिल रोजी मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपास पिंपळगावराजा पोलीस करीत आहेत.