संग्रामपूर नगरपंचायतीत ४ विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर नगरपंचायत सभागृहात विषय समिती सभापतींची काल, २१ फेब्रुवारीला दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर होत्या. नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत शेळके, कार्यालय अधीक्षक शरद कोल्हे यांची उपस्थिती होती. बांधकाम, आरोग्य, बालकल्याण, पाणी पुरवठा जलनिस्सारण समिती या ४ समित्यांसाठी प्रहार जनशक्ती व संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने समिती निहाय प्रत्येकी एक अर्ज असल्याने सभापतींची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी जाहीर केले. यात बांधकाम सभापतीपदी कलीमा बी शेख मजीद, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी लक्ष्मीबाई नारायण वानखडे, उपसभापतीपदी कविता हरिभाऊ तायडे,आरोग्य सभापतीपदी लता अनंता वानखडे, नगरपंचायत उपाध्यक्ष संतोष काशीनाथ सावतकार यांची पाणी पुरवठा सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.