उद्यापासून शेगाव येथील श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले! ई पासची गरज नाही
मार्च २०२० पासूनच राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू म्हणून प्रशासनाने धार्मिक स्थळे बंद केली होती. त्यानंतर नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. शेगाव येथे संस्थांनच्या वतीने ई-पास द्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. राज्यात कोरोनाचा आलेख घसरल्यानंतर १ एप्रिल २०२२ पासून सर्व प्रकारचे कोरोना प्रतिबंध हटविण्यात आले होते.
मात्र १० एप्रिल पर्यंतचे भाविकांनी आधीच बुकिंग केलेले असल्याने तोपर्यंत मंदिर सार्वजनिकरीत्या खुले करण्यात आले नव्हते . कोविड साठी केलेली व्यवस्था हटविण्याची ११,१२ आणि १३ एप्रिल रोजी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर उद्या १४ एप्रिलपासून आता मंदिराचे द्वार सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता कोणत्याही पूर्वनोंदणीची आवश्यकता नसल्याने संस्थांनच्या वतीने कळविण्यात आले आहे.