४ ऑक्टोबरला शेगाव तहसील कार्यालयावर धडकणार शेतकरी , शेतमजुरांचा आसूड मोर्चा! मागण्या वाचून तुम्ही म्हणाल, आम्ही शेतकऱ्यांसोबत..
Sep 26, 2022, 20:34 IST
शेगाव( संतोष देठे पाटील: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ ऑक्टोबर रोजी शेगाव तहसील कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांचा आसूड मोर्चा धडकणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन बैठक आज, २५ ऑक्टोबर रोजी शेगाव येथील कुणबी समाज भवनात पार पडली.
अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. विना अट पीक विमा मिळाला पाहिजे, लम्पी रोगावर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली त्यांना तात्काळ मदत उपलब्ध झाली पाहिजे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना सुद्धा दरमहा चार हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या मागण्यांसाठी हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीला तालुक्यातील बहुतांश शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.