50 हजार रुपयांत किडनी… मलकापूरच्‍या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला!; सरकारकडे मागितली परवानगी!!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत लोणवडी (ता. मलकापूर) येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी हे निवेदन काल, 9 जूनला पाठवले. दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सेंट्रल बँक ऑफ …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत लोणवडी (ता. मलकापूर) येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन काल, 9 जूनला पाठवले.

दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्‍थेकडून गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. पीक कर्जाचे पुनर्गठण आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी किडनी विक्रीची परवानगी देण्यात यावी. आम्‍ही कोणत्‍याही गरजवंतास अवघ्या 50 हजार रुपयांत प्रतिकिडनी या दराने किडनी देण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्‍हटले आहे.