६५ आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिकेचे वाटप; उपविभीय अधिकारी तेजश्री कोरे यांचा पुढाकार

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील आदिवासी बहुल गाव शेंबा, पिंगळी जहाँगीर, सालवण या गावात अन्न पुरवठा विभागाच्या सर्वेत आदिवासी कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याचे निदर्शनास आले होते. या तिन्ही गावांतील ६५ आदिवासी कुटुंबांना स्वातंत्र दिनी अन्न सुरक्षा योजनेतून उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या पुढाकाराने शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तहसीलदार श्री. चव्हाण, निरीक्षण अधिकारी डॉ. प्रवीणकुमार वराडे …
 
६५ आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिकेचे वाटप; उपविभीय अधिकारी तेजश्री कोरे यांचा पुढाकार

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील आदिवासी बहुल गाव शेंबा, पिंगळी जहाँगीर, सालवण या गावात अन्न पुरवठा विभागाच्या सर्वेत आदिवासी कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याचे निदर्शनास आले होते. या तिन्ही गावांतील ६५ आदिवासी कुटुंबांना स्वातंत्र दिनी अन्न सुरक्षा योजनेतून उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्‍या पुढाकाराने शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तहसीलदार श्री. चव्हाण, निरीक्षण अधिकारी डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्‍यासह पुरवठा विभागाचे श्री. शेगोकार व कर्मचारी, संबंधित स्वस्त धान्य दुकानदार सुभाष सोनोने यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी आदिवासी बांधवांना घरपोच शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. सप्टेंबरपासून वितरीत शिधा पत्रिकेवर धान्य मिळणार असल्याने आदिवासी कुटुंबाकडून समाधान व्यक्त होत आहे.