शेगावच्या गजानन महाराजांचे मंदिर मध्यरात्रीपासून बंद होणार
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने पुन्हा एकदा शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रींचे मंदिर 21 फेब्रुवारीच्या रात्रीपासून दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले आहे. 22 मार्चपासून 17 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी …
Feb 21, 2021, 23:18 IST
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने पुन्हा एकदा शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रींचे मंदिर 21 फेब्रुवारीच्या रात्रीपासून दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले आहे. 22 मार्चपासून 17 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी मंदिर कोरोनाच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले होते. या काळात ४ लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.